गव्हाचा चीक एक प्रकारचे आपले पारंपरिक सुपरफूड आहे. कुरडया करण्यासाठीही गव्हाचा चीक वापरला जातो. हा गव्हाचा चीक शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. साधारणपणे १०० ग्रॅम गव्हाचा चिक घेतला तर त्यातून ४५० कॅलरीज मिळतात. जाणून घ्या गव्हाचा चीक खाण्याचे फायदे –
ऊर्जावर्धक
गहू कार्बोहायड्रेट्सचा समृद्ध स्रोत आहे, त्यामुळे त्याचा चीक शरीराला ऊर्जा देतो आणि थकवा दूर करतो
पौष्टिकता
गव्हाच्या चिकामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडे आणि केस मजबुत होतात. या व्यतिरिक्त चिकातून प्रोटीन्स आणि स्टार्च स्वरुपातले कार्बोहायड्रेट्सही भरपूर मिळतात.
पचनासाठी फायदेशीर
गव्हामध्ये फायबर भरपूर असते, त्यामुळे गव्हाचा चीक पचनक्रिया सुधारण्यात मदत करतो. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.
त्वचेसाठी फायदेशीर
गव्हातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी व चमकदार ठेवण्यास मदत करतात.
वजन नियंत्रणासाठी उपयुक्त
गव्हाचा चीक पोट भरल्यासारखे वाटवतो, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.
स्नायूंच्या वृद्धीस उपयुक्त
विशेषतः गव्हातील ग्लूटेन हा प्रोटीनचा एक प्रकार असून तो स्नायूंच्या वृद्धीस उपयुक्त ठरतो.
रक्तशुद्धी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी
गव्हातील लोह रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो.