लसूण भूक वाढवण्यावर, पोट दुखीवर, दातदुखीवर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. लसूण केवळ जेवणाचीच चव वाढवत नाही तर त्यातील पोषक आणि औषधी घटकांमुळे तुमच्या शरीरालाही फायदे होतील. रोज रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्या तर शरीर आरोग्यदायी राहण्यास मदत होते. आयुर्वेदातही लसणाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. (Health benefits of Garlic clove)

भूक वाढविण्यास मदत (Help increase appetite)
अनेकांना भूक न लागण्याची समस्या असते. अशा वेळी लसूण खाणे या लोकांसाठी आरोग्यदायी ठरते. लसूणमुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. यामुळे भूक वाढते. याशिवाय अनेकांना अॅसिडीटीचा त्रास असतो. त्यांच्यासाठी लसून गुणकारी आहे. पोटात अ‍ॅसिड तयार होऊ लागते आणि अशावेळी लसूण खाल्यास अ‍ॅसिड तयार होण्यापासून रोखते. त्यामुळे अॅसिडीटीपासून आराम मिळतो.

पोटदुखीवर गुणकारी (Effective against stomach ache)
अनेकांना पोटदुखीसंबंधित समस्या असते. त्याच्यासाठी लसूण अत्यंत गुणकारी ठरतो. लसणाच्या सेवनाने पोटातील आरोग्यास अपायकारक पदार्थ साफ होण्यास मदत होते.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी (To keep the heart healthy)
धमन्यांना लवचिक करण्यास लसून अत्यंत फायदेशीर ठरतो. लसूण फ्री ऑक्सिजन रॅडिकल्सपासून हृदयाचे संरक्षण करण्याचे मदत करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहते.

दातांच्या वेदनांवर फायदेशीर (Beneficial on toothache)
अनेकांना दातदुखी किंवा दातांसंबंधित समस्या असतात. त्यांनी जर लसणाची एक पाकळी खाल्ली तर त्यांना या समस्येपासून दिलासा मिळण्यास मदत होईल. लसणात वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. यामुळे दातदुखीपासून आराम मिळण्यास मदत मिळते. जेथे वेदना होत आहेत त्या ठिकाणी लसणाची एक पाकळी बारीक करुन लावल्यास दातांच्या वेदना दूर होतील.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)