अंजीर फळामध्ये कॅलरीज, प्रोटीन, फॅट, कार्बोदके, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि फायबर असतात. अंजीरमध्ये असणारे व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

अंजीर हे थंड असते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे.

अंजीर रक्त शुद्ध करते. तसेच पचनासंबंधीच्या समस्या, रक्तदाब, अशक्तपणा यांसारख्या आजारांवर अंजीर गुणकारी आहे.

अंजीरमध्ये असणारे कॅल्शियम घटक हाडांना मजबुती मिळते.

अंजिरामध्ये फायबर असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. पोट साफ होण्यास मदत होते.

अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.

अंजीरच्या सेवनामुळे कोलॅजनचे प्रमाण योग्य राहते. त्यामुळे त्वचा निरोगी राहते.

शरीरातील मेलनिनची कमतरचा भरुन काढण्याचे काम अंजीर करते. त्यामुळे श्वेतकोडाचा त्रास होत नाही.