मेथीचे दाणे (Fenugreek seeds) शरीराच्या आरोग्यासाठी तसेच अनेक आजारांवर उपयोगी आहेत. मेथीमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रोटीन आणि लोह यासारखे अनेक पोषक तत्व असतात. मेथीमध्ये असणाऱ्या लोह आणि कॅल्शियमच्या पोषक घटकांमुळे हाडे मजबूत आणि निरोगी बनतात. जाणून घ्या मेथी दाणे खाण्याचे फायदे तसेच मेथीचे दाणे कोणत्या आजारांवर उपयोगी आहेत –
डायबेटिज रुग्णांसाठी गुणकारी
डायबेटिज असणाऱ्यांनी एक चमचा मेथी दाणे एका ग्लासात रात्रभर पाण्यात भिजवावे आणि सकाळी हे पाणी तुम्ही रिकाम्या पोटी प्यावे. रोज हे प्यायल्याने रक्तातील साखर कमी होऊन डायबेटिज नियंत्रणात येण्यासाठी मदत होते.
मात्र मेथीचं पाणी पिण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.
मासिक पाळीच्या समस्या
मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी, त्रास आणि चिडचिड मेथीचे पाणी पिल्याने कमी होते.
सांधेदुखीवर गुणकारी
एका ग्लासात गरम पाणी घेऊन त्यात मेथी पावडर आणि सुंठ एकत्र करून दिवसातून कमीत कमी दोन वेळा प्या. त्यामुळे तुमची सांधेदुखीचा त्रास कमी होईल.
पोटदुखीवर गुणकारी
पोट दुखत असेल तर एक चमचा मेथी दाणे तव्यावर भाजून गरम पाण्याबरोबर घ्या. पोटदुखी नक्कीच कमी होईल.
बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो
बद्धकोष्ठाचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात मेथी पावडर मिसळून ते प्या.
टीप : मेथीचे दाणे शरीरासाठी गरम असतात, त्यामुळे याचं अधिक प्रमाणात सेवन करू नये. तसेच वरील उपाय करताना वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा.