- सुक्या खोबऱ्यामुळं अन्नाची चव वाढते. सुक्या खोबऱ्यामध्ये भरपूर पोषक घटक देखील असतात. सुक्या खोबर्यात प्रथिनं, जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शिअम, मॅग्नीज, सेलिनियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. जाणून घ्या सुके खोबरे खाण्याचे फायदे –
अशक्तपणावर मात
लोहाच्या कमतरतेमुळे हा अशक्तपणा येतो आणि यामुळे अनेक आजार होऊ शकतात. सुक्या खोबऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशक्तपणावर मात करण्यासाठी आहारात सुक्या खोबऱ्याचा समावेश करावा. गुळ खोबरं एकत्रं खाणं किंवा सुक्या खोबर्याचा समावेश केलेले पौष्टिक लाडू खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहातं.
रोगप्रतिकार शक्ती वाढवते
सुक्या खोबर्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज आणि सेलेनियम आढळतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून हे पोषक घटक विषाणूजन्य रोगांपासून शरीराचे रक्षण करतात.
स्मरणशक्ती मजबूत करते
सुके खोबरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. सुके खोबरे खाल्ल्याने मेंदूचं कार्य सुधारण्यात मदत होते. नियमित सुके खोबरं खाऊन आपण अल्झायमर सारख्या कोणत्याही भयानक रोगापासून दूर राहू शकता.
संयोजी ऊतकांसाठी फायदेशीर
सुक्या खोबर्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराच्या संयोजी ऊतकांना मजबूत करतात. आहारात सुक्या खोबर्याचा समावेश केल्याने संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांचा धोकाही कमी होतो.
सांधेदुखी कमी होते, हाडांची झीज होत नाही
सुके खोबरं नियमित खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते, हाडांची झीज होत नाही. तसेच इतर गंभीर आजारांचा धोकाही कमी होतं.
भूक शमते, रक्ताचा प्रवाह सुरळीत राहातो
सुक्या खोबर्यातील फायबरमुळे पोट भरल्यासारखं राहातं, जेवणापर्यंत भूक लागत नाही. सुके खोबरं चावून खाल्लं तर भूक शमते, रक्ताचा प्रवाह सुरळीत राहातो. सुक्या खोबर्यात फिनॉलिक हा घटक असतो जो अँण्टिऑक्सिडण्टससारखा काम करतो. तसेच सुक्या खोबर्यामुळे पेशींचं ऑक्सिडेशन होण्याचं टळतं.
हृदय निरोगी राहते
सुके खोबरे आहारातील फायबरने समृद्ध आहे आणि ते निरोगी हृदय ठेवायला मदत करतं.