शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, बीटा सोडियम यांसारखे अनेक गुणकारी गुणधर्म आढळून येतात. शेवग्याच्या शेंगांपासून भाजी, सूप, सांबर इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. जाणून घ्या नियमितपणे शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे –

डायबेटिज
डायबेटिजचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी शेवग्याच्या शेंगा वरदान आहेत. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच यामुळे चाचपय सुधारण्यास मदत होते.

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते
शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.

ऊर्जा वाढते
शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढण्यास मदत होते.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते
शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.

हाडे बळकट होतात
हाडांच्या आरोग्यासाठी या शेंगा अत्यंत गुणकारी आहेत. यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.

केस गळतीवर प्रभावशाली
शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश केल्याने केस गळतीची समस्या कमी होण्यास मदत होते.

संधिवात कमी होण्यास मदत
संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांनी रोजच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन केले पाहिजे. यामुळे संधिवात कमी होण्यास मदत होईल.

टीप : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानकारक असतो. त्यामुळे शेवग्याच्या शेंगा अधिक प्रमाणात खाऊ नये. तसेच पथ्य असणाऱ्या लोकांनी वैद्यकीय सल्ल्यानुसारच आहार घ्यावा.