कढीपत्त्याने पदार्थाना चव येते. कढीपत्त्यामध्ये असणारी कार्बोदके, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई असते.
कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, कढीपत्त्याची पाने अनशापोटी चावून खावीत.
कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने पचन क्रिया व्यवस्थित राहते.
नियमित कढीपत्ता खाणारे लोक तरुण दिसतात.
डायबेटिज असणाऱ्यांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला मदत होते.
कढीपत्त्याने डोळ्यांची ज्योती वाढते. नियमित कढीपत्त्याचे सेवन केल्यास डोळ्याचे विकार होत नाहीत.
अपचनाचा त्रास झाला असेल तर कढीपत्त्याची पाने चावून खाल्ली खावीत. कढीपत्त्याचा रस पोटात गेल्यामुळे लगेचच आराम पडतो.
भूक लागत नसेल तर आहारात कढीपत्त्याचा समावेश करावा. यामुळे भूकवाढीस मदत होते.
जर शरीरामध्ये फॉलिक ऍसिडचे प्रमाण कमी असल्यास आपण कढीपत्त्याचा दैनंदिन आहारात समावेश करावा. त्यामुळे थकवा येणार नाही आणि प्रतिकारशक्ती देखील वाढेल.
कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सीडेंट तत्व असतात. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत.
कढीपत्त्यामध्ये लोह तत्त्व, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं. याचे सेवन केल्याने केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबते.
कढीपत्त्याची पाने वाळवून त्याची पावडर करून ती खोबरेल तेलात केसांना मिसळून लावावीत. यामुळे केस पांढरे होत नाहीत तसेच केसगळती कमी होते.
कढीपत्त्याची पाने ही रक्तवर्धक व रक्तशुद्धीकारक आहेत. या पानांच्या नियमित सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
चेहऱ्यावर काळे वांग, मुरमे पुटकुळ्या येत असतील, केस गळणे, केसांत कोंडा होणे, महिलांना मासिक पाळी नियमित येत नसेल तसेच रक्तस्राव कमी होत असेल यांसारख्या तक्रारी असतील तर नियमितपणे कढीपत्त्याच्या पानांचा काढा २-२ चमचे सकाळ-संध्याकाळ घ्यावा.