मसाला बनवण्यामध्ये लवंग हा पदार्थ दिसायला छोटासा असतो. परंतु तो एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करतो. तसेच त्याचे औषधी गुणधर्मही असतात. चला तर मग आज आपण जाणून घेऊया लवंग खाण्याचे फायदे-
– लवंग खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आपण कोणत्याही आजाराचा सामना करू शकतो.
– तुम्हाला जर गॅसची समस्या जाणवत असेल तर दोन लवंग घेऊन अर्धा कप पाण्यात ते टाका. ते पाणी उकळवा. त्यानंतर त्याचे सेवन करा. असे रोज तीन वेळा करा. त्यामुळे पोटाच्या गॅसची समस्या दूर होते.
– पिंपल्सची समस्या असेल तर तुम्ही लवंगाच्या तेलाचा वापर करू शकता. या तेलात अँटी मायक्रोबिल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होते.
– दात दुखत असतील तर लवंगाच्या तेलाचा वापर करावा. त्यासाठी लवंगाचे तेल घ्या आणि कापसावर लावून ते दाताला लावा. दातदुखी झटक्यात गायब होईल.
– तोंडाची दुर्गंधी दूर करायची असेल तर लवंग खावा. नियमित लवंग खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.
– याशिवाय तुम्हाला जर खोकल्याचा त्रास होत असेल तर लवंग खावेत. रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन ते तीन लवंग खाल्ल्यास खोकला दूर होईल.