चणे नियमित खाल्ले तर अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन बी सह अन्य गुणकारी घटक असतात. जे आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर असतात. जाणून घ्या चणे खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे –
सर्दी कमी होण्यास मदत होते
चणे गरम करून रुमालात घेऊन त्याचा वास घेतल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते.
वजन कमी होण्यास मदत होते
सकाळच्या नाष्ट्यामध्ये चणे खाल्ले तर वजन कमी होण्यास मदत होते.
मेंदूची शक्ती, कार्यक्षमता, पचनशक्ती वाढते
चणे खाल्ल्याने पचनशक्ती वाढते तसेच मेंदूची शक्ती, कार्यक्षमता देखील वाढते.
रक्त शुद्ध होते, त्वचा उजळते
चणे रक्त शुद्धीकरण करण्यास मदत करते ज्याने त्वचा उजळते.
डायबिटीज रुग्णांसाठी गुणकारी
डायबिटीज रुग्णांना चणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. २५ ग्रॅम काळे चणे भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी खा यामुळे डायबिटीजची समस्या कमी होते.
अशक्तपणा कमी होतो
अशक्तपणा आलेल्या रुग्णांना चणे अतिशय फायदेशीर आहेत.
चेहऱ्यावर चमक येते
चणे भिजविलेल्या पाण्याने चेहरा धुतला तर चेहऱ्यावर चांगली चमक येते.