वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. सुगंध आणि चवीसाठी वापरली जाणारी वेलची आरोग्यवर्धकही आहे. जाणून घ्या नियमित वेलची खाण्याचे फायदे –

पचना संबधीत सर्व आजार दूर होतात
वेलचीच्या सेवनाने पचनासंबधीत सर्व आजार दूर होतात व पचन क्रिया सुरळित होण्यास मदत मिळते. पोटदुखी कमी करतं.

एनिमियावर गुणकारी
लाल रक्त पेशींची वाढ करण्यात मदत करते. त्यामुळे वेलचीचे नियमित सेवन केल्यास एनिमिया होत नाही. तसेच शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होत नाही.

मुख दुर्गंधी दूर होते
अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. वेलचीमध्ये एक अँटी बॅक्टिरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते.

ऍसिडिटी कमी करते
वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर ऍसिडिटी दूर होते, शिवाय पोटात होणारी जळजळ थांबते.

सर्दी खोकल्यावर गुणकारी
वेलची ही गुणधर्माने थोडी गरम असते. त्यामुळे वेलचीचे सेवन केल्याने वारंवार होणाऱ्या सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळतो.

डोकेदुखीवर गुणकारी
वेलची ही डोकेदुखीचा त्रास कमी करण्यात देखील मदत करतं. डोकेदुखी असल्यास वेलचीची पेस्ट करुन कपाळावर थोडावेळ लावल्याने डोकेदुखी होते.