पांढऱ्या मीठापेक्षा काळे मीठ (Black Salt) हे अधिक लाभदायी आहे. काळे मीठ हे आयुर्वेदात वापरले जाणारे एक अत्यंत लाभदायक आणि औषधी गुणधर्म असलेले मीठ आहे. याला सैंधव मीठ, संधव लवण, बिट लवण असेही म्हणतात. काळ्या मीठामध्ये पोटॅशिअम, आर्यन आणि कॅल्शिअम असते. काळे मीठ हे चवीला अधिक चविष्ट असते. हे मुख्यतः खड्याच्या मीठापासून तयार केले जाते आणि त्याला नैसर्गिक खनिज व गंधक यांचे मिश्रण असते. काळ्या मीठामध्ये इतर मीठाच्या तुलनेत लोह आणि खनिजाचा अधिक साठा असतो. जाणून घ्या काळे मीठ खाण्याचे फायदे –
मधुमेहासाठी गुणकारी
मधुमेहाचा त्रास जर तुम्हाला असेल तर तुमच्यासाठीही काळे मीठ फारच फायद्याचे आहे. काळे मीठ तुमच्या शरीरातील इन्सुलिन नियंत्रित ठेवण्याचे काम करते. त्यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
पचनासाठी उपयुक्त
काळे मीठ पचनसंस्थेला मदत करते. अपचन, गॅसेस, अॅसिडिटी यावर आराम मिळतो. भूक वाढवण्यास आणि अन्न पचण्यास मदत होते. काळ्या मीठाच्या सेवनामुळे तुम्हाला पचनाशी निगडीत कोणतीही समस्या होत नाही. काळ्या मीठामुळे पोटात अँन्झाईम्स अॅक्टिव्ह होतात. हे इन्झाईम्स पचन सुधारण्याचे काम करतात.
त्वचेसाठी गुणकारी
चेहरा ओला करुन अगदी थोडेसे काळे मीठ घेऊन ते चेहऱ्याला चोळा. अगदी हलक्या हाताने तुम्ही हे मीठ चेहऱ्याला चोळा. त्यामुळे चेहरा स्वच्छ होण्यास मदत मिळेल.
कोणत्याही सुगंधी तेलामध्ये तुम्ही काळे मीठ घालून त्याचा उपयोग बॉडी स्क्रब म्हणून केला जातो. त्यामुळे शरीरावरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते.
वजन कमी करण्यास मदत
वजन कमी करण्यासाठी काळे मीठ गुणकारी आहे. काळ्या मीठामध्ये असलेले घटक शरीरातील चरबी विरघळवण्यास मदत करते. दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही थोडेसे काळे मीठ घालून ते पाणी प्यायलात तर वजन कमी होण्यास मदत मिळेल.
काळे मीठ शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.यामुळे चयापचय सुधारतो आणि वजन नियंत्रित राहते.
उलट्या आणि मळमळ थांबवते
लिंबूपाण्यात काळे मीठ टाकून घेतल्यास मळमळ कमी होते.