काळ्या मनुक्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे फायबर, साखर, कॉपर, आर्यन, मॅग्नेशिअम, कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन यांसारखे घटक असतात.काळी द्राक्षे सुकवून काळे मनुके बनवले जातात. सहजपणे उपलब्ध होऊ शकणाऱ्या काळ्या मनुक्यांचा आपले आरोग्य सुधारण्यास मोठा हातभार लागतो. जाणून घेऊयात काळ्या मनुक्यांचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे –
वजन वाढवण्यासाठी तसेच कमी करण्यासाठीही उपयुक्त
काळ्या मनुक्यांमध्ये असणारे ग्लुकोझ आणि फ्रुकट्रोस शरीरातील उर्जा वाढवते. तसेच वजन वाढीसाठी उपयुक्त ठरते. जेवल्यानंतर मनुके खाल्ल्याने वजन वाढते.
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर रात्री कोमट किंवा थंड पाण्यात मनुके भिजत घावलेत. सकाळी उठल्यानंतर या मनुक्यांचे पाण्यासहीत सेवन करावे.
अशक्तपणा, ऍनिमिया
काळ्या मनुक्यांमधील व्हिटॅमिन, लोह आणि कॉपर रक्त वाढीसाठी उपयुक्त आहे. अशक्तपणा किंवा ऍनिमिया जाणवत असेल तर काळे मनुके अवश्य खावेत.
केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
काळ्या मनुक्यांतील व्हिटॅमिन, मॅग्नेशिअम, पोटॅशिअममुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
काळ्या मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी केसांचा काळा रगं टिकण्यास मदत करतो.
काळ्या मनुक्यांमुळे केसगळती कमी होते तसेच केस मजबूत, चमकदार होतात.
ब्लड प्रेशर नॉर्मल राहते.
नियमित कळे मनुके खाल्ल्याने आपले ब्लड प्रेशर नॉर्मल राहते. सोडियमचे कमी-जास्त प्रमाण ब्लड प्रेशरच्या समस्येस कारण आहे. सकाळी सकाळी उपाशी पोटी मूठभर काळा मनुका खाल्ल्यास रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होते.
थकवा, ताणतणाव कमी होतो
काळे मनुके खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. थकवा, ताणतणाव कमी होतो. त्यामुळे रोज सकाळी काळे मनुके खावेत.
पित्ताचा त्रास कमी होतो
काळ्या मनुक्यांत पोटॅशियम, आणि मॅग्नेशियम हे घटक हातात. त्यामुळे काळे मनुके खाल्ल्याने शरीरातील पित्ताचा त्रास कमी होतो.
निरोगी त्वचेसाठी उपयुक्त
काळ्या मनुक्यांतील घटक त्वचेखालील स्किनसेल्सची पुर्ननिर्मिती करते. यामुळे त्वचा डॅमेज होण्यापासून वाचते. काळ्या मनुक्यांच्या सेवनामुळे तुमची त्वचा चमकदार बनते. काळ्या मनुक्यामध्ये व्हिटॅमिन सीमुळे त्वचा अधिक तरुण दिसते.
हाडे बळकट आणि मजबूत बनतात
काळ्या मनुक्यांमध्ये हाडे बळकट आणि मजबूत करण्यासाठी आवश्यक असणारे कॅल्शिअम असते. त्यामुळे नियमित आणि योग्य प्रमाणात काळ्या मनुक्याचे सेवन करावे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
काळ्या मनुक्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट नजर सुधारण्यास आणि डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते.
मधुमेह आजारावर गुणकारी
काळ्या मनुक्यामध्ये असलेला गोडवा हा नैसर्गिक असतो. रक्तातील साखर त्यामुळे नियंत्रणात राहते. मधुमेहींनी वैद्यकीय सल्ल्यानुसार काळे मनुके खावेत.
पोटदुखी आणि पचनाच्या समस्यांवर गुणकारी
काळ्या मनुक्यांमध्ये फायबर आणि पोटॅशिअम असते. त्यामुळे पोटदुखी आणि पचनाच्या समस्या कमी होतात