बीटामध्ये ( Beetroot) अनेक प्रकारचे न्युट्रीएंट्स, फोलेट, मॅग्नीस, पोटॅशिअम, लोह आणि व्हिटॅमिन सी असते. आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी बीट गुणकारी आहे. एक कप बीटाच्या ज्यूसमध्ये (100 Gm) 43 कॅलरीज असतात. यामध्ये 87 टक्के पाणी 8 टक्के कार्बोहायड्रेट्स आणि 3 टक्के फायबर असते. जाणून घ्या नियमितपणे बीट खाण्याचे फायदे –
मेंदूचे कार्य
मेंदूशी निगडीत आजार डिमेंशिया या आजारापासून दूर राहायचे असेल तर बीटाचे सेवन करावे. मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी शरीरात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळणे शरीरासाठी गरजेचे असते. याशिवाय मेंदूला उत्तम रक्तपुरवठा मिळणेही गरजेचे असते. बीटामध्ये असलेले नायट्रेडेट्स नावाचे घटक शरीरातील रक्ताचा पुरवठा सुरळीत करतात. त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत सुरु राहते.
रोग प्रतिकारकशक्ती वाढते
बीटमध्ये असणारे फायबर्स हे पोट साफ ठेवण्यासाठी मदत करतात. तसंच बीटामधून नैसर्गिक साखर मिळते. त्यामुळे तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा नैसर्गिक प्रमाणात प्राप्त होते. यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालते
बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालते.
हिमोग्लोबिनही वाढतं
शरीरातील ऑक्सिजन वाढण्यासाठी बीटाचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. बीटामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्याशिवाय रक्ताचं शुद्धीकरण होऊन हिमोग्लोबिनही वाढतं.
ब्लडप्रेशर नियंत्रणात
बीटमध्ये नायट्रेड्स नावाचा एक घटक असतो. जो ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो.
कामात स्टॅमिना वाढतो
बीटाचे सेवन केल्याने तुमच्या शारिरिक कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होऊ शकते. बीटरूटचे सेवन स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. नियमित बीटरूट खाल्ल्याने शरीरात ऑक्सिजन वाढतो.
वजन कमी करण्यास मदत
बीटामध्ये उपलब्ध असणाऱ्या फायबरमुळे भूक कमी लागते. बीट हे सॅलेडमध्ये खाल्ल्याने किंवा बीटाचा ज्यूस पिल्याने वजन कमी करण्यामध्ये मदत होऊ शकते. बीटामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आणि कॅलरीज कमी आढळून येतात. लो कॅलरी असणारे अन्न आणि व्हेजेटेबल्स खाल्ल्याने वजन कमी करण्यामध्ये मदत मिळते.
त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी
बीटामध्ये असलेले व्हिटॅमिन्स त्वचेच्या आत जाऊन काम करत असल्यामुळे त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळते. बीटामधील हे घटक त्वचेच्या खाली असलेले कोलॅजन एकत्र धरुन ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा चमकदार बनते.
रक्तप्रवाह सुरळीत करुन त्वचेवर येणाऱ्या पिंपल्सना घालवण्याचे काम बीट करते.
बीटामध्ये अँटीऑक्सिडंट, लोह, पोटॅशिअम,लोह आणि सोडिअम असते ज्यामुळे त्वचेला मॉश्चराईज होण्यास मदत मिळते.
त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि त्वचेवर असलेला तजेला परत मिळवण्यासाठी बीटाचे सेवन करायला हवे. बीटा चे फायदे लक्षात घेत बीटामुळे रक्त प्रवाह सुरळीत होण्यात मदत केल्यामुळे आणि त्यातील अँटीऑक्सिडंट घटकामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत मिळते.
टीप – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानकारक असतो. बीटाचा ज्यूस अधिक प्यायला तर तुमच्या शरिरातील साखरेची पातळी वाढू शकते.