बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात. शरीराला आवश्यक असणाारी ऊर्जा मिळते आणि दिवसभर काम करण्यासाठी उत्साह राहतो. जाणून घ्या बाजरी खाण्याचे फायदे –

कोलेस्ट्रॉल घटवते
बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉलची पातळी घटविण्याचे काम बाजरीतील पोषक तत्व करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. याशिवाय बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते.

हाडे मजबूत बनतात
बाजरीचे नियमित सेवन केल्याने हाडांना चांगली मजबूती मिळते आणि हाडांच्या अनेक आजारांपासूनही दूर राहता.

सर्दी आणि खोकल्याचा त्रास
सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच बाजरीचा आपल्या आहारात समावेश करून घ्या. सकाळी नाश्त्याला गूळ घालून बाजरीचा घाटा तयार करून तुम्ही नियमित प्यायल्यास ही समस्या दूर होते.

वजन नियंत्रणात राहते
बाजरीमुळे तुमचे वजन झटकन कमी होण्यास मदत मिळते. बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर पटकन भूक लागत नाही आणि तुमचे पोट भरलेले राहते. तसंच बाजरी तुमचे वजन नियंत्रित करण्यास मदत करते.

केस गळण्याची समस्या
केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी आपल्या आहारात बाजरीचा समावेश करावा. बाजरीमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.

पित्त कमी होते
बाजरीमध्ये मॅग्नेशियम असते ज्याने पित्त कमी होते.

टीप : बाजरीच्या अतिसेवनामुळे थायरॉईड आणि गोइटरच्या समस्या उद्भवतात. कारण बाजरीमध्ये काही पदार्थ असतात जे आयोडीन शोषून घेतात.
ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी जास्त बाजरी खाणं टाळा. बाजरी खाल तर थायरॉईड वाढू शकतं.