तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी कफ, पित्त, वातहारक असते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पोट साफ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ, पुटकुळ्या येत नाहीत. तसेच त्वचा नितळ बनते. तांबे शरीरात मेलॅनीनच्या निर्मितीमध्ये मदत करते. तांबे त्वचेच्या पेशींची निर्मिती करण्यास मदत करते. तांब्यातील अॅन्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता यामुळे चेहर्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने दिवसभर शरीर ऊर्जावान राहते तसेच फ्रेश राहते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिणे पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ट, अतिसार यांसारख्या समस्यांवर तांब्याच्या भांड्यातील पाणी गुणकारी आहे. तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे पोटातील जिवाणूंचा नाश होतो. जळजळ होण्याची समस्या कमी होते.
यकृत आणि मूत्रपिंड निरोगी ठेवण्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी उपयोगी ठरते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी संधिवात आजार दूर ठेवते. तसेच शरीरातील युरिक अॅसिड कमी करण्यास मदत करते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहते. तांब्यातील खनिजं थायरॉईडग्रंथींचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात.
तांबे रक्तातील लोह वाढवते तसेच रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत करते. त्यामुळे अॅनिमिया असणाऱ्या व्यक्तींनी तांब्याच्या भांड्यातील पाणी अवश्य प्यावे.
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅन्टीबॅक्टेरीयल व अॅन्टीवायरल असते. त्यामुळे जखम भरण्यास मदत होते. तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होऊन वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
टीप – तांब्याच्या भांडे नेहमी स्वच्छ असावे. तांब्याच्या भांड्याचा उपयोग केवळ पाणी साठवण्याकरिता करावा. त्यात लिंबू सरबत यांसारखी पेय ठेऊ नयेत. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यानंतर अर्धा तास चहा, कॉफी पिऊ नये.
केवळ ओठांसाठीच नाही लिपबाम गुणकारी, जाणून घ्या इतर सौंदर्यवर्धक उपयोग