सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी एक औषध म्हणून कार्य करते. जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे फायदे –
शरीरातील विषारी घटक ( Eliminates Toxins from the Body)
सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी तसेच रात्री झोपताना देखील कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
कोमट पाणी शरीराचं अंतर्गत तापमान वाढवते त्यामुळे घाम येतो. घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
पचनक्रिया सुधारते (Improves Digestion)
कोमट पाण्यामुळं अन्नपचन लवकर होण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी पचनतंत्र सावकाश काम करत असतं अशा वेळी कोमट पाणी पिल्याने अन्न पचन लवकर होण्यास मदत होते.
अंगदुखी- सांधेदुखी (Relieves Body and Joint Pain)
कोमट पाण्यामुळे शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रित होतो. त्यामुळे अंगदुखी सांधेदुखी कमी होते.
सर्दी -खोकेला (Effective Against Cold and Cough)
सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असलं तर कोमट पाणी प्या. कोमट पाण्यामुळं कफ बाहेर पडण्यास मदत होते तसेच घशाचे इन्फेक्शन देखील कमी होते.
त्वचा फ्रेश आणि तरूण दिसते (Keeps Skin Fresh and Youthful)
झोपण्यापूर्वी कोमट पाण्याचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
केस गळती कमी होते (Reduces Hair Fall)
आतील उष्णतेचे संतुलन राखल्याने केसांची मुळे बळकट होतात आणि केस गळणे कमी होते.
रक्ताभिसरण सुधारते (Enhances Blood Circulation)
कोमट पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि रक्ताभिसरण सुरळीत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.