खोकला कमी होतो
कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला बरा होऊ शकतो.
कफ कमी होतो
पावसाळ्यात सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळतो.
केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारते
कोमट पाण्याच्या नियमित सेवनामुळे कोरड्या त्वचेत आद्रता निर्माण होतो. त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते. केस अधिक चमकदार होतात. केसांच्या वाढीसाठी कोमट पाणी पिणे महत्वाचे आहे.
पिंपल्स कमी होतात
कोमट पाण्याच्या नियमित सेवनामुळे पिंपल्सची समस्याही दूर होते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी नियमितपणे कोमट पाणी पिणे फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने शरीराची चयापचय वाढते.
शरीरात ऊर्जा निर्माण होते
कोमट पाणी पिण्यामुळे शरीरातील क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते.
रक्ताभिसरण सुरळीत राहते
सकाळी कोमट पाणी पिल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित प्रकारे होते.