कोरोना आल्यानंतर बहुतांशी लोकांनी कोमट पाणी(warm water) पिण्यास सुरुवात केली होती. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे या व्यतिरिक्तही कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

पचनक्रिया सुधारते
सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी तसेच रात्री झोपताना देखील कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. कोमट पाण्यामुळं अन्नपचन लवकर होण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी पचनतंत्र सावकाश काम करत असतं अशा वेळी कोमट पाणी पिल्याने अन्न पचन लवकर होण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठता आणि ॲसिडीटीचा त्रास देखील कमी होतो.

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात
कोमट पाणी शरीराचं अंतर्गत तापमान वाढवते त्यामुळे घाम येतो. घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात
झोपण्यापूर्वी कोमट पाण्याचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे त्वचा फ्रेश आणि तरूण दिसते .

किडनीस्टोनचा त्रास कमी होतो
किडनीस्टोनचा त्रास कमी होण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाणी प्या. जे लोक नियमितपणे कोमट पाणी पितात त्यांना किडनीस्टोनचा त्रास होण्याची शक्यता कमी असते.

अंगदुखी- सांधेदुखी कमी करते
कोमट पाण्यामुळे शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रित होतो. त्यामुळे अंगदुखी सांधेदुखी कमी होते.

सर्दी -खोकेल्याचा त्रास कमी होतो
सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असलं तर कोमट पाणी प्या. कोमट पाण्यामुळं कफ बाहेर पडण्यास मदत होते तसेच घशाचे इन्फेक्शन देखील कमी होते.