शरीराची ऊर्जा वाढविण्यासाठी भाताची पेज आरोग्यवर्धक आहे. तांदूळ शिजवून झाल्यावर जेव्हा आपण भात काढून घेता तेव्हा त्यामधील पाणी फेकून न देता ते पाणी पिण्यासाठी वापरावे. झटपट आणि हेल्दी नाश्ता म्हणून भाताच्या पेजेचा नक्की आहारात समावेश करावा. जाणून घ्या तांदूळ पेज पिण्याचे फायदे
शरीराला ऊर्जा मिळते
भाताच्या पेजेमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मुबलक असल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. या कार्बोहायड्रेसचे विघटन करून शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. भाताची पेज पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते.
त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी
भाताची पेज त्वचेची चमक वाढवते. तसेच कोरडी त्वचा, खुले छिद्र आणि मुरुमांसारख्या समस्या कमी होतात.
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
भाताच्या पेजेमध्ये सोडियम मुबलक प्रमाणात असल्याने तांदळाच्या पेजमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
पोटाचे आरोग्य सुधारते
भाताच्या पेजेमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते परिमाणी मेटाबॉलिझम वाढविण्यास मदत होते. पचनतंत्र सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही.
व्हायरल इंफेक्शन, अशक्तपणा दूर करते
व्हायरल इंफेक्शनमुळे तापाच्या किंवा उलट्यांच्या त्रासाने अशक्तपणा आल्यास जेवणाऐवजी पेज प्या. यामुळे आजरपण दूर होईल शिवाय शरीरातील पोषणद्रव्यांची झीज भरून काढण्यास मदत होते.