कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूधाचे सेवन केले जाते. पावसाळा संपून थंडीला सुरूवात झाली की वातावरणात होणाऱ्या बदलांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मसाले दूध पिणं फायदेशीर ठरतं. जाणून घ्या मसाला दूध पिण्याचे फायदे –
बुद्धी, मेंदूची कार्यक्षमता वाढते
मसाला दूध पिल्याने शरीर निरोगी राहते तसेच मेंदू आणि शरीराची कार्यक्षमता वाढते.
तणाव दूर होण्यास मदत होते –
मानसिक ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी कोजागिरीला मसालेदूध जरूर प्या.
कोजागिरीच्या रात्री आजूबाजूचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि उत्साही असते.
कॅल्शियमची कमतरता दूर होते –
दूधात कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असते. कॅल्शियम दात आणि हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचे असते.
शांत झोप येते
रात्री झोपण्यापूर्वी मसाले दूध पिल्याने शांत झोप येते.