उन्हाळा सुरू झाला की शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे उन्हाळ्यात सरबत, ज्यूस, कोल्ड्रिंक्स यांसारखी विविध प्रकारची पेय पिण्यावर भर दिला जातो. कोल्ड्रिंक्स किंवा आर्टीफिसिअल फ्लेवर वापरून बनवलेले पेय पिण्याऐवजी नैसर्गिक, घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. यासाठी कोकम सरबत हा एक उत्तम पर्याय आहे. कोकम फळाच्या अर्कापासून कोकम सरबत तयार केला जातो. या अर्कामध्ये हवे तेव्हा पाणी मिसळून सरबत बनवता येते. कोकम सरबत शरीरारातील पाण्याची कमतरता दूर तर करतेच शिवाय शरीराला एनर्जीही देते. जाणून घेऊयात कोकम सरबत पिण्याचे इतर महत्वाचे फायदे
शरीरातील उष्णता कमी होते
कोकम सरबताच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते. शरीरात थंडावा निर्माण होतो.
पचनसंस्था सुधारते
कोकम सरबताच्या सेवनाने चयापचय क्रिया अधिक वेगाने आणि चांगल्या पद्धतीने काम करते. त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होत नाहीत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
कोकमच्या फळामध्ये व्हिटामिन सी, सायट्रिक अॅसिड यासोबतच अनेक पोषकतत्वे असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
डायरियावर गुणकारी
तुम्हाला जर डायरियाचा त्रास होत असेल तर तुम्ही कोकम सरबत नक्की प्यायला हवा. कारण यात अँटीडायरिया गुण असतात.
ट्यूमरपासून वाचण्यासाठी
कोकम फळाचं सेवन केल्याने शरीरात ट्यूमर होण्याची जोखीम कमी होते. यामध्ये अँटी ट्यूमर गुण आढळतात.
निरोगी हृदयासाठी, रक्दाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त
कोकममध्ये कॅलरी अतिशय कमी असतात. तसेच कोकमाच्या फळामध्ये बी कॉम्प्लेक्स, विटामिन्स, पोटॅशियम, मँगनीज आणि मॅग्नेशियमसारखे पोषक तत्व असतात. हे गुण हृदयाची गती आणि रक्तदाबाची मात्रा नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरते.