दुधाला पूर्ण अन्न म्हणतात त्यामुळे अनेकांच्या आहारात दुधाचा समावेश असतो. काही लोक फक्त दूध पितात तर काही लोक दुधाची चव गोड लागावी म्हणून त्यात साखर टाकतात. साखरेऐवजी जर दुधात गूळ मिसळून पिल्यास अनेक फायदे होतात.

शरीराची झीज भरून निघते
दुधात गुळ मिसळून पिल्यास शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे शरीराची झीज भरून निघते. थकवा, ताणतणाव कमी होतो.

रक्तातील अशुद्ध घटक निघून जातात
दुधात गुळ मिसळून पिल्यास रक्त शुद्ध राहण्यास मदत होते. रक्तातील विषारी आणि अशुद्ध घटक निघून जातात.

पचनसंस्था सुरळीत कार्य करते
दूध आणि गुळाच्या नियमित सेवनानारे पचनसंस्थेशी निगडित आजार कमी होतात. अन्न पचनाच्या क्रियेला चालना मिळते. पोटात गॅस निर्माण होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

कफच्या त्रासावर गुणकारी
दूध आणि गुळाचे मिश्रण थंड वातावरणात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण करण्यास मदत करते. यामुळे कफचा त्रास कमी होतो.

रक्त वाढीसाठी उपयुक्त
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास दुधात गूळ मिसळून प्यावा. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन बरोबरच रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते.

चरबी घटवण्यासाठी उपयुक्त
दुधात गूळ मिसळून पिल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. चरबी कमी झाल्याने वजन देखील कमी होते.