बेलफळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर, प्रथिने, लोह इत्यादी उपयुक्त खनिजे असतात. उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा सरबत पिणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जाणून घ्या बेलफळाचे सरबत पिण्याचे फायदे

शरीरातील उष्णता कमी होते
बेलफळाचे सरबत पिल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

ऊर्जा मिळते
उन्हाळ्यात उष्णतेमुळे थकल्यासारखे ,निरुत्साही वाटते. बेलफळाचे सरबत पिल्याने इन्स्टंट एनर्जी मिळते.

पचनशक्ती सुधारते
बेलफळाच्या सरबतामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. अपचन, बद्धकोष्ठता, मुळव्याधी, पोटदुखी, गॅस होणे या समस्यांपासून मुक्ती मिळते.

मधुमेह
मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी बेलफळाचे सरबत अवश्य प्यावे. बेलामुळे शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

श्वसनाचे आजार
ज्या लोकांना दमा, सर्दी तसेच श्वसनाचे इतर आजार आहेत त्या लोकांसाठी बेलफळाचे सरबत हे अत्यंत गुणकारी मानले जाते.

रक्त शुद्ध होण्यास मदत होते
बेलफळाच्या सरबतामुळे शरीरातील अतिरिक्त टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त
बेलफळाच्या सरबतामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, पुरळदेखील कमी होतात. यासाठीच त्वचा सुंदर आणि नितळ बनते.