दूधात तूप टाकून प्यायल्याने शरीराला खूप फायदे होतात. तसेच आयुर्वेद देखील तूप मिसळून दूध पिण्याचा सल्ला देतो. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. जाणून घ्या दूधात तूप मिसळून पिण्याचे फायदे –
झोप न येण्याची समस्या दूर होते
रात्री झोपताना गरम दुधात एक चमचा तूप पिल्याने शरीरावर खूप सकारात्मक परिणाम होतो. रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यानेही झोप न येण्याची समस्या दूर होते. दुधात तूप मिसळून प्यायल्याने शरीरातील स्नायू शिथिल होण्यास मदत होते. स्नायू शिथिल झाले की शांत आणि चांगली झोप लागते.
पोटासाठी फायदेशीर
दुधात तूप मिसळून प्यायल्याने पचनशक्ती वाढते. यात ब्यूट्रिक अॅसिड असते. ते आपल्या शरीरातील पचनासाठी असलेले एंझाईम्स वाढवतो.
दुधात तूप मिसळून प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढते आणि पचनक्रिया चांगली राहते. पोटात गॅस तयार होत नाही. हे शरीरातील वाईट पदार्थ बाहेर काढून शरीराला डिटॉक्स करण्याचं काम करतं.
दूध आणि तूपाचं मिश्रण मेटॅबॉलिझम चांगलं करतं आणि आपल्या शरीरातील ऊर्जा आणि पचनशक्ती वाढवतं.
बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दूधामध्ये तूप टाकून प्यावं.
एनर्जी वाढते
काम करताना लवकर थकत असाल तर दुधात तूप मिसळून प्या. यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि काम करण्याचा स्टॅमिना वाढतो.
वजन कमी करण्यासाठी उपयोगी
रात्री झोपताना दुधात तूप मिसळून प्यायल्याने पोट भरलेले राहते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
दूधामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
रोग प्रतिकारशक्ती वाढते
दुधात तूप घालून प्यायल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून शरीराचे संरक्षण होते.