दूध आणि फळांचा गर मिक्सरमध्ये एकत्र वाटून फ्रुट स्मुदी बनवली जाते. स्मूदीमध्ये अनेक पोषक घटक असतात. जाणून घ्या फ्रुट स्मुदी पिण्याचे फायदे

कोलेस्टेरॉल कमी होते
फ्रुट स्मुदीमध्ये सोल्युबल फायबर असतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी
फ्रुट स्मुदीमध्ये अँटीऑक्सिडंट, फायटोकेमिकल्सही फ्लेव्होनाइड्स असतात, त्यामुळे हृदयविकारापासून संरक्षण मिळते.

वजन कमी होते, पचनक्रिया सुधारते
फ्रुट स्मुदीमध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सारखी भूक लागत नाही, परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. तसेच पचनसंस्थाही व्यवस्थित राहते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
फ्रुट स्मुदी पिल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

हाडांच्या आरोग्यासाठी गुणकारी
फ्रुट स्मुदीमध्ये असणारे कॅल्शियम आणि मॅगनीज हाडांना मजबूत बनवण्याचे काम करते.

गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण राहते
फ्रुट स्मुदी पिल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे गोड पदार्थ खाण्यावर देखील नियंत्रण राहते.

टीप – फ्रुट स्मुदी नेहमी ताजी असतानाच पिली पाहिजे. जास्त वेळ बनवून ठेवलेली फ्रुट स्मुदी पिणे आरोग्यास हानिकारक आहे.