बडीशेप थंड गुणधर्माची असते तसेच जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित आणि सहज होते. बडीशेप प्रमाणेच बडीशेपचे पाणी देखील आरोग्यासाठी गुणकारी आहे. जाणून घ्या रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे –
पचनाशी संबंधित समस्या, ऍसिडिटी दूर होते
आयुर्वेदानुसार बडीशेप पचनासाठी अत्यंत प्रभावी आहे. बडीशेपमधील घटक पाचक रस नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे ऍसिडिटी, गॅस, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो
बडीशेपमध्ये पोटॅशियम आढळते ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने ही समस्या कमी होते.
त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी
बडीशेपच्या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी, घातक पदार्थ बाहेर टाकले जाण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य देखील चांगले राखले जाते. त्वचेवर लाल पुरळ, खाज येणे यांसारख्या समस्या निर्माण होत नाहीत.
कोलेस्ट्रॉल कमी होते
बडीशेपचे पाणी नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.