वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा उपयोगी मानला जातो. वाढते वजन नियंत्रित करायचे असेल, तर रात्री झोपेच्या आधी कॅमोमाइल चहा प्या. यामुळे केवळ वजनच नियंत्रित होणार नाही, तर झोपही चांगली येते.

वेदना कमी करण्यासाठी मदत करते
कॅमोमाइल चहाचे सेवन मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करते.

तणाव, चिंता कमी होतात
कॅमोमाइलमध्ये वेदनशामक गुणधर्म आहेत. त्यामुळे तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत होते. कॅमोमाइल चहा प्यायल्याने मज्जातंतू शांत होतात, तणावाची पातळी कमी होते.

सर्दी आणि फ्लूच्या कमी होण्यास मदत
कॅमोमाइल चहामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सर्दी आणि फ्लूच्या कमी करण्यास मदत करतात.