गाजरामध्ये पोटॅशियम, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात आढळतात. गाजर कठीण आणि टणक असल्याने खाताना त्रास होतो तसेच गाजर व्यवस्थित चावून खाल्ले नाही तर, पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. नुसते गाजर खाण्यापेक्षा गाजराचा ज्यूस बनवून त्याचे सेवन केल्यास शरीराला अधिक फायदे मिळतात. जाणून घ्या गाजर ज्यूस पिण्याचे फायदे
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण हे अधिक असते, जे की अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
डायबेटिज रुग्णांसाठी गुणकारी
ज्या लोकाना डायबेटिजचा त्रास आहे, त्या लोकांनी काय गाजरचा ज्यूस थोड्याश्या प्रमाणात सेवन करावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यात उपयुक्त
एका ग्लास गाजरच्या रसाचे सेवन केल्याने फॅटलॉस होण्यास मदत होते. त्यामध्ये असलेले पोषक शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी
गाजराच्या ज्यूसमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. शारीरिक स्वास्थ्य सुधारते. तसेच केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते. केस गळती कमी होऊन केस मजबूत आणि चमकदार बनतात.
हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते
गाजराचा रस घेतल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
पचनशक्ती मजबूत होते
गाजरमध्ये भरपूर फायबर आढळतात. हे पचन सुधारण्यासाठी, पोटाच्या समस्यांवर गाजराचा ज्यूस पिणे खूप फायदेशीर आहे.
कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते
गाजरामध्ये आढळणारे कॅरोटीनोईड कंपाऊंड गाजरच्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज गाजराचा रस घेतल्यास कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते
गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असल्याने गाजरचा ज्यूस पिल्याने डोळे निरोगी राहतात, दृष्टी सुधारते.
त्वचेच्या समस्यांवर गुणकारी
गाजरचा ज्यूस पिल्याने यामुळे त्वचेला ग्लो येतो. त्वचेवरील मुरूम, मुरुम, काळे डाग कमी होतात.