ॲपल सायडर व्हिनेगर (Apple cider vinegar) प्यायचं असेल तर एक ग्लास पाण्यात एक ते दोन चमचे ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून जेवणानंतर एक तास किंवा जेवणाच्या अर्धा तास आधी प्या.
वजन कमी होण्यास मदत करते
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात. तसेच अॅपल सायडर व्हिनेगरमुळे चयापचयाची प्रक्रिया सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी, १ ते २ चमचे ॲपल सायडर व्हिनेगर १ ग्लास कोमट पाण्यात मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.
घसादुखीवर गुणकारी
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात त्यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो.
पोटाचे त्रास कमी होतात
पोटदुखीचा त्रास असेल तर १ ग्लास पाण्यात १ ते २ चमचे ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून प्या.
माऊथवॉश
तोंडाची दुर्गंधी येत असेल तर ॲपल सायडर व्हिनेगर माऊथवॉश म्हणून वापरू शकता. मात्र त्याच्या वापराचा अतिरेक नको आणि ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये पाणी मिसळूनच माऊथवॉश म्हणून वापरावे.
मधुमेहींसाठी लाभदायक
ॲपल सायडर व्हिनेगर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत करतात.
टीप – ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये पाणी घालून ते नेहमी पातळ करा, नंतर ते वापरा कारण यात ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे आरोग्याला हानी पोहचू शकते. तसेच ॲपल सायडर व्हिनेगरचे सेवन अतिप्रमाणात करू नये.