गीर म्हणजेच देशी गाई. गीर गाय ही भारतातील सर्वात जुनी गाईची प्रजात आहे. गीर गाईची जात चांगल्या दुग्धोत्पादनासाठी ओळखली जाते. गीर गाईच्या दुधात विविध प्रकारचे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, एमिनो ऍसिड, उत्तम फॅट्स, खनिजे, नायट्रोजन, फॉस्फरस, कॉपर, लोह, आयोडिन, फ्लोरिन, झिंक, सिलिकॉन, सेलेनिअम, मॅग्नेशिअम हे घटक असतात. गीर गाईच्या दुधाप्रमाणेच तूपही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गीर गाईचे तूप चवीला अधिक पौष्टिक असते. जाणून घ्या गीर गाईचे तूप (Gir cow ghee) खाण्याचे फायदे –
शरीराचा विकास आणि वाढ
गीर गाईच्या दुधापासून बनवले जाते आणि ते शुद्ध तूप मानले जाते, कारण त्यात संरक्षक, रसायने आणि इतर हानिकारक घटक यांसारखे कोणतेही ऍड-ऑन टाकलेले नाहीत. हाडांचे आरोग्य आणि संपूर्ण शरीराचा विकास आणि वाढ करण्यासाठी गीर गाईचे तूप हे एक आदर्श मुख्य अन्न मानले जाते.
स्मरणशक्ती वाढते
गीर गाईचे तूप सेवन केल्याने मानसिक आरोग्य सुधारते.तसेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात राहते
गीर गाईचे तूप चांगल्या कोलेस्टेरॉलचा स्रोत आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. गीर गाईच्या तूपाच्या नियमित सेवनाने चयापचय क्रिया वाढते.
रोग प्रतिकार शक्ती वाढते
गीर गाईच्या तुपामध्ये चांगले प्रोबायोटिक्स असतात. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
हाडांची मजबूती आणि विकास
गीर गाईचे तूप हे हाडांसाठी नेहमीच चांगले असते. कारण यात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असतात. ज्याचा हाडांची मजबूती आणि विकास होण्यासाठी फायदा होतो.
निरोगी त्वचेसाठी गुणकारी
गिर गाईच्या तुपातील समृद्ध अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचे संपूर्ण आरोग्य सुधारू शकतात. गीर गाईचे तूप सर्वोत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. तुमची कोरडी त्वचा किंवा त्वचेच्या इतर कोणत्याही समस्येवर गीर गाईचे तूप गुणकारी आहे. फाटलेल्या ओठांवर तुपाचा थर लावल्याने ओठ मुलायम बनतात.
कोलेस्टोरॉलची लेव्हल नियंत्रणात राहते
गीर गाईचे तूप नियमित खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टोरॉलची लेव्हल योग्य प्रमाणात राहते.
पचनशक्ती सुधारते
पचनशक्ती वाढवण्यासाठी गीर गाईचं तूप उत्तम आहे.
केसांना हायड्रेट करते
तुमचे केस निस्तेज व खराब झाले असतील तर स्कल्प मजबूत करण्यासाठी गीर गाईचे तूप वापरू शकता. तूपात बरेच फॅटी अॅसिड असतात जे केसांना आतून हायड्रेट करतात.