केस गळणे, केसांत कोंडा होणे, घामामुळे खाज सुटणे, केसांना दुर्गंधी येणे यांसारख्या केसांच्या अनेक समस्यांवर कापूर तेल गुणकारी आहे. जाणून घ्या कापूर तेलाच्या वापराचे फायदे आणि कापूर तेल कसे बनवावे याविषयी माहिती –

कोंड्यावर प्रभावशाली
कापूर तेलाच्या वापराने केसांतील कोंडा, घाण कमी होण्यास मदत होते. तसेच कोंड्यामुळे येणारी खाजही कमी होते. डोक्याच्या त्वचेला थंडावा मिळतो. रात्री झोपण्याआधी कापूर तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसात होणाऱ्या कोंड्याचे प्रमाण कमी होईल

केस गळती थांबते
कापूर तेलाच्या वापराने केसांचे गळणे कमी होते. केस दाट आणि काळे बनतात.

केस चमकदार बनतात
कापूर तेलाच्या वापराने केस चमकदार बनतात.

केसांना फाटे फुटणे
केस निस्तेज, रखरखीत कमजोर आणि तुटक झाले असतील अथवा केसांना फाटे फुटत असतील तर अशा केसांना अंड्याचा गर आणि कापूर तेल एकत्र करून लावावे.

उन्हापासून केसांचे संरक्षण
कडक उन्हामुळे केस कोरडे आणि कमकुवत होतात. त्यामुळे केसगळती सुरू होते. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी कापूर तेलाचा वापर करावा.

कपूर तेल बनविण्याची पद्धत

२ चमचे खोबरेल तेल कोमट होईपर्यंत गरम करा. त्यात २-३ कापराच्या वड्या बारीक करून टाका आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या आणि केसांना लावा.