महाशिवरात्रीनिमित्त शंकराची पूजा केली जाते. तसेच उपवास धरला जातो. तसेच शंकराला बेलपत्र वाहिले जाते. या बेलपत्राचे आपल्या शरीरासाठीही खूप फायदे आहेत. बेलाचे फळ, मूळ, पान आणि फांद्या यांचा उपयोग औषध बनवण्यासाठी केला जातो.
मधुमेह
मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी बेलपत्र अवश्य खावे. कारण बेलाची पानं शरीरातील साखर नियंत्रित ठेवतात.
श्वसनाचे आजार
ज्या लोकांना दमा, सर्दी तसेच श्वसनाचे इतर आजार आहेत त्या लोकांसाठी बेलाचे पान हे अत्यंत गुणकारी मानले जाते. या पानांपासून तेल काढले जाते. ते या आजारांपासून संरक्षण देते.
बद्धकोष्ठता
बेलाचे पान घ्या. त्यावर मीठ आणि मिरपूड लावा. त्यानंतर हे पान तोंडात टाकून चघळत बसा. असे केल्याने बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते.
विषावर प्रभावी
एखाद्या व्यक्तीला साप वा विंचू चावला असेल तर त्यासाठी बेलाची पानं फायदेशीर ठरतात. आतड्यांमधून विष काढून टाकण्यासाठी बेलाची पाने वापरली जातात. मुंगी सारखे काही कीटक चावल्यानंतर त्यावर बेलाच्या पांनाचा रस लावल्याने जळजळ कमी होते.
अतिसार
बेलमध्ये टॅनिन असते. त्यामुळे ते अतिसार, कॉलरा यासारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे.
उपवासाला साबुदाणा खाताय? तुम्हाला ‘हे’ आजार असतील तर खाणे टाळा!