बीटमध्ये मॅग्नीस, पोटॅशिअम, लोह, व्हिटॅमिन सी अमी फोलेट यांसारखे पौष्टिक घटक असतात. रक्तवाढीसाठी उपयोगी असणारे बीट त्वचेच्या आरोग्यासाठीही गुणकारी आहे. जाणून घ्या बीट खाण्याचे फायदे-

ऑक्सिजन वाढवतो (Increase Oxygen level)
बीटामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.तसेच रक्ताचं शुद्धीकरण होऊन हिमोग्लोबिनचे तसेच ऑक्सिजन प्रमाण वाढते. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असेत तर शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.

पचनसंस्था सुरळीत राहते (Improves Digestive Health)
बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत राहते

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते ( controlled high Blood Pressure)
बीटमध्ये असणारा नायट्रेड्स नावाचा घटक ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो.

मेंदूची कार्यक्षमता वाढते (Increases brain function)
बीटामध्ये असलेले नायट्रेडेट्स नावाचे घटक शरीरातील रक्ताचा पुरवठा सुरळीत करतात. त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत सुरु राहते. तसेच मेंदूची कार्यक्षमता वाढते.