बीटमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी आणि लोह अधिक प्रमाणात आढळते. एक कप बीटाच्या ज्यूसमध्ये 43 कॅलरीज असतात. यामध्ये 87 टक्के पाणी 8 टक्के कार्बोहायड्रेट्स आणि 3 टक्के फायबर असते. जाणून घ्या बीटचा ज्यूस पिण्याचे फायदे –
हिमोग्लोबीनची कमतरता दूर होते
बीटचा ज्यूस पिल्याने शरिरातील रक्त साफ होते. शरिरामध्ये हिमोग्लोबीनही वाढते.
अशक्तपणा दूर होतो
बीटचा ज्यूसमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे त्याचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो.
वजन कमी करण्यास मदत करते
कमी कॅलरी असणारे अन्न खाल्ल्याने वजन कमी करण्यामध्ये मदत होते. बीटामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आणि कॅलरीज कमी आढळून येतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
उच्च रक्तदाब कमी
बीटचा ज्यूस पिणे हे उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या लोकांसाठी गुणकारी आहे. बीटचा ज्यूस पिल्याने नाइट्रेट्स हे नायट्रिक ऑक्साइडमध्ये रुपांतरीत होते. ज्यामुळे ब्लड व्हेसल्स पातळ होतात आणि उच्च रक्तदाब कमी होतो.
यकृताचे कार्य सुरळीत राहते.
बीटामध्ये फ्लेव्होनॉईड्स, सल्फर आणि बीटा कॅरोटीन देखील पुरेशा प्रमाणात आढळते. यामुळे यकृताचे कार्य सुरळीत राहते.
त्वचेसाठी गुणकारी
बीटमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, त्यामुळे त्याचे सेवन त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. बीटामधील हे घटक त्वचेच्या खाली असलेले कोलॅजन एकत्र धरुन ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते.
बीटामध्ये अँटीऑक्सिडंट, लोह, पोटॅशिअम,लोह आणि सोडिअम असते ज्यामुळे त्वचेला मॉश्चराईज होण्यास मदत मिळते.
बीटामुळे रक्त प्रवाह सुरळीत होण्यात मदत केल्यामुळे आणि त्यातील अँटीऑक्सिडंट घटकामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत मिळते.
हाडे मजबूत होतात
बीटरूटमध्ये कॅल्शियम असते. त्यामुळे बीटचा ज्यूस पिल्याने हाडे मजबूत होतात.
मेंदूचे कार्य करते सुरळीत
मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी शरीरात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळणे शरीरासाठी गरजेचे असते. याशिवाय मेंदूला उत्तम रक्तपुरवठा मिळणेही गरजेचे असते. बीटामध्ये असलेले नायट्रेडेट्स नावाचे घटक शरीरातील रक्ताचा पुरवठा सुरळीत करतात. त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत सुरु राहते.
टीप : कोणत्याही परीक्षेचे अतिसेवन घातकच असते. बीटचे अतिसेवन केल्याने शरिरातील साखरेची पातळी वाढू शकते.