सैंधव मिठाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. तसेच सैंधव मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यानेही शरीराला खूप फायदे होतात. मॅग्नेशियम सल्फेट यालाच सैंधव मीठ म्हणून ओळखले जाते. सैंधव मिठामध्ये झिंक, सल्फेट, लोह, मँगनीज, मॅग्नेशियम यांसारखे घटक असतात. जाणून घ्या सैंधव मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने होणारे फायदेत्वचेसाठी गुणकारी
सैंधव मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने शरीरावरील मृत त्वचा निघून जाते. त्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात
सैंधव मीठ त्वचेत साठलेले विषारी द्रव बाहेर टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात थोडे सैंधव मीठ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. सैंधव मीठातील पोषक घटकांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. यामुळे शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात.वेदनाशामक
सैंधव मीठ वेदनाशामक आहे. अंग दुखत असेल तर स्नायूंना सूज आली असेल तर सैंधव मिठाच्या पाण्याने अंघोळ करावी.ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते
सैंधव मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने क्रियाशीलता वाढते, ताजेतवाने वाटते, आळस जातो. कारण सैंधव मीठ शरीरात रक्त प्रवाहाचा वेग वाढतो तसेच शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये रक्त संक्रमित होते. तसेच रक्तदाबाच्या समस्या कमी होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.टीप – आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही सैंधव मिठाच्या पाण्याने अंघोळ करू शकता. रोज सैंधव मिठाचा वापर करू नये.