तुळशीला धार्मिक कार्यात फार महत्व आहे. तुळशीला सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. तुळस ही औषधी गुणयुक्त एक बहुपयोगी वनस्पती आहे. तिच्या बहुगुणी गुणधर्मामुळे तुळशीला आयुर्वेदात खूप वरचे स्थान आहे. तुळस ही आरोग्यास फायदेशीर असते, हे सर्वांना माहित आहेच. पण तिचे नैसर्गिक फायदेसुद्धा आहेत.

१) २४ तास ऑक्सिजन देते

तुळस ही प्रदूषण नाशक आहे. तुळस २४ तास ऑक्सिजन देते. तुळशीमुळे वातावरणात अधिक प्रमाणात ऑक्सिजन पसरण्यास मदत होते. त्यामुळे अवतीभोवती वातावरण शुद्ध आणि स्वच्छ राहते. स्वच्छ वातावरणाचा अनुकूल परिणाम सर्वांच्याच मानसिकतेवर होतो. यामुळे नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढीस लागते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालण्याने आरोग्य उत्तम राहते.

२) डासांना दूर ठेवते

तुळशीच्या रोपाच्या आसपास डास आणि इतर कीटक फिरकत नाहीत. डासांपासून बचाव करण्यासाठी तुळशीचे रोप घराच्या अंगणामध्ये अवश्य असावे.

३) विषारी प्राणी येत नाहीत

तुळशीच्या जवळ साप किंवा विंचू असे विषारी प्राणी शक्यतो येत नाहीत.

४) वातावरण प्रसन्न राहते

तुळशीच्या मंद सुगंधामुळे वातावरण प्रसन्न राहते.