सर्व प्रकारीच्या स्किनसाठी उपयुक्त असणारी मुलतानी माती त्वचेसाठी एक वरदान आहे. चेहऱ्यावर मुलतानी मातीचा मास्क लावण्याने त्वचेच्या समस्या कमी होऊन त्वचा अधिक तरुण, तेजस्वी आणि मुलायम बनते. जाणून घ्या चेहऱ्याला मुलतानी माती लावण्याचे फायदे –

त्वचेची छिद्रे मोकळी होतात
चेहऱ्यावर मुलतानी मातीचा मास्क लावण्यामुळे त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि त्वचा स्वच्छ होते. त्वचेला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. तसेच त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारते.

त्वचा चमकदार बनते
चेहऱ्यावर मुलतानी मातीचा मास्क लावण्याने त्वचेचा निस्तेजपणा कमी होतो. तसेच त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.

त्वचेचा पोत सुधारतो
त्वचेकडे दुर्लक्ष किंवा अती प्रमाणात सौंदर्यप्रसाधने आणि त्यामधील केमिकल्सचा वापर केल्यामुळे त्वचेचा पोत बिघडतो आणि त्वचा निस्तेज दिसते. चेहऱ्यावर मुलतानी मातीचा मास्क लावल्याने त्वचेचा पोत सुधारून त्वचा टवटवीत दिसते.

डेड स्कीन निघून जाते
चेहऱ्यावर मुलतानी मातीचा मास्क लावण्याने चेहऱ्यावरील डेडस्कीन निघून जाते. डेडस्कीनचा थर निघाल्याने त्वचेचं योग्य पोषणही होते. त्वचेच्या इतर समस्या उद्भवत नाहीत.

चेहऱ्यावर कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत
मुलतानी मातीचा मास्क सर्व प्रकारीच्या त्वचेसाठी सूट होतो. त्याचे चेहऱ्यावर कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत.