सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषणमूल्ये असतात. यात कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ही खनिजे तर ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे असतात. तसेच तंतुमय भाग, प्रथिने हे घटकही असतात. वजन कमी करण्यासाठी सफरचंदाचा ज्यूस अतिशय उपयोगी आहे. सफरचंदाचा ज्यूस अतिशय चविष्ट असून आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या सफरचंदाचा ज्यूसचे सेवन केल्याने वजन कसे कमी होऊ शकते.

सफरचंदांमध्ये भरपूर फायबर असते. जे चयापचय वाढवण्याबरोबरच पचनक्रिया बरोबर ठेवते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच फायबर तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवते. सफरचंदाच्या ज्यूसचे सेवन केल्याने शरीरातील चरबी विशेषतः पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. त्यात असलेले पॉलिफेनॉल घटक यासाठी उपयोगी आहे .१०० ग्रॅम सफरचंदात फक्त ५० कॅलरीज आढळतात. ज्यामध्ये साखर १९ ग्रॅम आणि फायबरचे प्रमाण सुमारे ३ ग्रॅम असते. इतर फळांमध्ये आढळणाऱ्या फ्रक्टोजपेक्षा हे प्रमाण कमी आहे. पॉलीफेनॉल पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते, तर फायबर तुम्हाला पोट भरण्यास मदत करते, जे तुम्हाला कमी कॅलरी खाण्यास आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करते.

टीप – आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर सालासमवेत सफरचंद ज्यूस बनवा. या फळाच्या सालीमध्ये ओरसोलिक आम्ल हा एक आवश्यक कंपाऊंड असतो, जो लठ्ठपणाशी लढायला मदत करतो. हे स्नायूची चरबी वाढवते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करते, त्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो.