प्राणायमामध्ये कपालभारती, भस्त्रिका, शितली, नाडी शोधन प्राणयाम, उज्जायी प्राणयम, अनुलोम-विलोम याचा समावेश होतो. अनुलोम-विलोम प्राणायम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. जाणून घ्या अनुलोम-विलोम प्राणायमाबद्दल माहिती Anulom-Vilom Pranayama –

अनुलोम-विलोम प्राणायम कसे करावे How to Practice Anulom-Vilom Pranayama?

पद्मासन, बद्धपद्मासन किंवा मांडी घालून बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा.

डाव्या नाकपुडीवर अंगठा ठेवून तुम्हाला उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास सोडा.

ही प्रक्रिया सुरुवातीला 5-10 वेळा करावे. त्यानंतर सरावाने क्षमता वाढवून 15 मिनिटांपर्यत अनुलोम-विलोम प्राणायम करू शकता.

अनुलोम- विलोम प्राणायम करण्याचे फायदे Benefits of Anulom-Vilom Pranayama

अनुलोम-विलोम मानसिक ताणतणाव कमी करण्यास मदत करते.

अनुलोम-विलोममुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

श्वसन क्रिया चांगली होण्यासाठी आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनुलोम- विलोम प्राणायम मदत करते.

अनुलोम-विलोममुळे त्वचा निरोगी चमकदार होते. हा प्राणायम शरीरातील टॉक्सिन्स (विषारी पदार्थ) बाहेर टाकण्यास मदत करतो, त्यामुळे त्वचा उजळ आणि निरोगी राहते.

पोटाचे आरोग्य सुरळीत करण्यासाठी आणि पाचकरसाची क्रिया ही अधिक चांगली करण्यासाठी अनुलोम- विलोम प्राणायम फायदेशीर आहे.

अनुलोम- विलोम केल्यामुळे शरीरात सकारात्मक उर्जा वाढते.

घोरण्याचा त्रास असणाऱ्यांनी अगदी न चुकता अनुलोम-विलोम करावे. शांत झोप येत नसल्यामुळे काहींना घोरण्याचा त्रास होतो. अशा लोकांना छातीवर ताण येतो. त्यांचा श्वासोच्छवास नीट होत नाही. अशावेळी जर तुम्ही प्राणायमातील अनुलोम- विलोमकेले तर झोपताना श्वास घेण्याचा होणारा त्रास कमी होतो. आणि श्वास अगदी सुलभ आणि योग्य पद्धतीने घेता येतो.

अनुलोम-विलोम प्राणायाम श्वास आणि श्वसन तंत्रासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दमा, खोकला कमी होतो. हा प्राणायम रोज केल्याने श्वासोच्छ्वासाच्या समस्या दूर होतात.

शरीरात योग्य आणि अधिक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा मिळाला तर शरीराला अगदी योग्य प्रमाणात रक्तपुरवठा मिळण्यास मदत मिळते.

अनुलोम-विलोममुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. रक्तदाब नियंत्रणात राहणं हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यामुळे हृदयाचे कार्य अधिक चांगले होते.

अनुलोम-विलोममुळे शरीराच्या ऊर्जा वाहिन्या संतुलित होतात.

अनुलोम-विलोममुळे मेंदूचा कार्यक्षमता वाढते.

अनुलोम-विलोममुळे हार्मोन्स संतुलित होतात.

जोपर्यंत मन शांत होत नाही, तोपर्यंत झोप लागत नाही. हा प्राणायाम मन स्थिर ठेवण्यास मदत करतो आणि झोपेच्या समस्यांवर प्रभावी ठरतो.

Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply