बहुगुणी आवळा अनेक आजारांवर गुणकारी आहे. आवळा हा ‘व्हिटॅमिन सी’चा खूप मोठा स्रोत आहे. पित्ताचा त्रास असेल तर नियमितपणे आवळा ज्यूस घ्यावा. जाणून घ्या आवळा ज्यूस बनविण्याची पद्धती –

साहित्य
आवळे, साखर, वेलची पूड, हिरवा रंग

कृती
आवळे कुकरमधून उकडून घ्यावेत.
बिया काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. आवळ्याच्या गराच्या दुप्पट साखर घालून गॅसवर शिजत ठेवावे. शिजत आल्यावर हिरवा रंग टाकून वेलची पूड घालावी. हवाबंद बाटलीत हे मिश्रण ठेवून द्यावे.
थंड पाण्यात हे २-३ चमचे हे आवळ्याचे मिश्रण टाकून सर्व्ह करावे.