बदामाच्या तेलात विटमिन ए, विटमिन बी, विटमिन ई, एसपीएफ-५, बायोटिन, अँटीबॅक्टेरियल घटक आढळतात. जे आरोग्यासाठी आणि सौंदर्यवाढीसाठी उपयुक्त आहेत.
बदाम तेल अँटी- एजिंग आहे. नियमित बदाम तेलाने मालिश केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन, स्किन टाईट होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा अंघोळीपूर्वी बदाम तेलाने त्वचेला मालिश करावी. यामुळे त्वचा तरुण, मुलायम आणि चमकदार दिसते.

बदाम तेलाचे इतर फायदे


ओठ मुलायम आणि गुलाबी बनतात
बदाम तेलाने ओठांना झोपण्यापूर्वी मालिश करावी. यामुळे ओठ मुलायम आणि गुलाबी बनतात.

केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
बदाम तेलामध्ये मॅग्नेशिअम असते. यामुळे केस गळती रोखण्यास मदत होते, केसांतील कोंडाही कमी होतो तसेच केसही मजबूत बनतात. बदाम तेलामध्ये ऑलिव्ह ऑईल मिक्स करून लावल्यास केसांचे फाटे फुटण्याचे प्रमाण कमी होते.

डार्क सर्कल कमी करण्यास उपयोगी
रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली बदाम तेलाने मालिश केल्याने डार्क सर्कल कमी होतात.

त्वचेचं आरोग्य उत्तम राखत
बदाम तेल त्वचेला पोषण देतं. त्यामुळे त्वचा मुलायम राहते. कोरडी पडत नाही. नियमित बदाम तेलाने मालिश केल्याने चेहरा उजळतो. तसेच चेहरा फ्रेश आणि टवटवीत राहतो.