कैरीच्या आतील भाग सुकवून बनवली जाणारी आमचूर पावडर आरोग्यासाठी गुणकारी आहे. आमचूर पावडरमध्ये प्रोटीन, फायबर, साखर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, सोडियम, जिंक, कॉपर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फॉलेट, थियामिन,व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के यांसारखे घटक असतात. पदार्थांमध्ये आंबटपणा आणण्यासाठी या पावडरचा वापर करतात. जाणून घ्या आमचूर पावडरचे फायदे –

डोळ्यांचे आरोग्य सुधारते
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही आमचूर पावडर अत्यंत उपयुक्त ठरते. कैरीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणांनी युक्त बीटा कॅरेटिन नावाचे तत्व आढळते. बीटा कॅरेटिनमुळ मोतीबिंदूचा धोका टळतो.

वजन कमी करण्यास मदत होते
आमचूरमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर हे घटक असतात. फायबरयुक्त पदार्थ वजन कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच व्हिटॅमिन सीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.

शरीरातील उष्णता कमी होते
आमचूर पावडर शरीरासाठी थंड आहे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

पचनक्रियेच्या समस्या कमी होतात
आमचूर पावडरच्या सेवनाने पोटाचे आरोग्य सुधारते. पोटातील गॅस निघून जाऊन पोट स्वच्छ करण्याची प्रक्रिया व्यवस्थित होते. आमचूरमध्ये फायबरचे प्रमाण असते आणि फायबर हे पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी उत्तम आहे.