मॉश्चराईझरचा वापर विशेष करून त्वचेसाठी केला जातो. मात्र या व्यतिरिक्तही मॉश्चराईझर अनेक कामांसाठी उपयोगी आहे. जाणून घ्या मॉश्चराईझरचे इतर उपयोग –

केस पटकन सेट करण्यासाठी
तुमचे केस विस्कटलेले, फ्रिझी असतील तर ते सेट करण्यासाठी केसांना थोडं मॉश्चराईझर लावा. त्यामुळे केस पटकन सेट होतात. रुक्ष दिसत नाही.

घट्ट अंगठी, बांगडी काढण्यासाठी
बोटांमधील अंगठी निघत नसेल तसेच हातात बांगडी जात नसेल किंवा हातातून बांगडी निघत नसेल तर मॉश्चराईझर लावा. मॉश्चराईझरमुळे घट्ट बांगडी, अंगठी सहज काढू शकता.

त्वचेचा दाह, आग कमी करण्यासाठी
थ्रेडींग, अप्परलिप्स,वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेला मॉश्चराईझर लावल्याने त्वचेचा दाह, आग कमी होते. तसेच वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेला मॉश्चराईझर लावल्यानेत्वचेवर पुरळ येत नाहीत.

शू बाईट
कधीकधी नवीन शूज घातल्यावर शू बाईटची समस्या निर्माण होते. शू बाईटचा त्रास कमी व्हावा म्हणून पायाला मॉश्चराईझर लावा.

नखे चमकदार आणि मऊ होतील
नखे जर खडबडीत, निस्तेज झाली असतील तर रात्री झोपताना नखांवर मॉश्चराईझर लावा. यामुळे नखे मऊ होतील.

फाटलेल्या टाचांवर गुणकारी
तळपायाच्या भेगांवर मॉश्चराईझर लावल्यास फाटलेल्या टाचा मऊ होतील.

कोपरांचा काळपटपणा घालवण्यासाठी
हाताचे कोपर काळे पडले असतील रोज रात्री झोपण्याआधी मॉश्चराईझरने ५-१० मिनिट मसाज करा. हा उपाय नियमितपणे करावा.