माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : चैत्र महिना उपवासांचा महिना असे म्हटले जाते. देवीच्या आराधनेसाठी लोक या महिन्यात उपवास ठेवत असतात. दरम्यान उन्हाळा सुरू झाल्याने अनेकांना या दिवसात दिवसभर उपवास केल्याने त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे आपण पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला अशक्यपणा जाणवणार नाही. (fasting in summer)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते उपवास शरीरासाठा चांगला असतो. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. शिवाय पोटाला आराम मिळून पचनसंस्था सुधारते.
हे ही वाचा ः शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर
उपवासातील फराळाचे अंतर किती असावे?
उपवास असल्यास फलाहार घेण्याचा प्रयत्न करा. शिवाय दिवसातून दोन वेळा उपवासाचे पदार्थ (फराळ) नक्की खावे. या फराळातील 7 ते 8 तासांचे अंतर असावे. शिवाय उन्हाळा असल्याने यादरम्यान तुम्ही पाणी किंवा ज्युस पिऊ शकतात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर शक्य झाल्यास उपवास करू नये. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी कमी होऊ शकते.
उपवासात आहार कसा असावा?
उपवासादरम्यान तुमच्या आहारात रताळे, बटाटे, साबुदाणा यांचा समावेश करावा. रताळे उकडून खाता येतील तर साबुदाण्याची खीर किंवा खिचडी करून खावी. याशिवाय तुम्ही, संत्री, अननस, डाळींबाचा ज्युस पिऊ शकता. तसेच ऊर्जा मिळविण्यासाठी सुका मेवा खाऊ शकतात.
हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध
या गोष्टी टाळा
बटाट्याचे आधिक सेवन टाळा
फार गोड खाणे टाळावे
उपवासाचे तळलेले पदार्थ खाणे टाळावे
उपवासाला बटाट्याचे चिप्स खाण्याऐवजी रोस्टेड मखना खावा
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)