व्यायाम करताना आरामदायक कपडे आणि पायात बूट घालावेत.
वॉर्मअप केल्याशिवाय व्यायाम सुरु करु नये.
व्यायाम करताना शरीरावर जास्त जोर देऊ नये.
व्यायाम करताना मधेमधे थोडीशी विश्रांती घ्यावी.
व्यायाम करताना विचारांची गती कमी करण्याचा प्रयत्न करावा. तसेच श्वासाकडे लक्ष केंद्रित करुन मन जास्तीत जास्त शांत करण्याचा प्रयत्न करा.
व्यायाम करुन झाल्यावर मार्जरासन आणि शवासन करावे.
शवासनामध्ये झोप लागत असेल तर झोपावे. झोप लागणे याचाच अर्थ आपण थकलो आहोत आणि शरीराला विश्रांतीची आवश्यकता आहे.
दररोज थोडा थोडा व्यायाम वाढवावा. एकाच दिवशी व्यायाम करू नये.