तुळस ही औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी वनस्पती आहे. तिच्या बहुगुणी गुणधर्मामुळे तुळशीला आयुर्वेदात खूप वरचे स्थान आहे. तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. त्याचप्रमाणे तुळशीची पाने उकळून पिल्याने देखील अनेक फायदे होतात.
तुळशीचे पाणी कसे बनवावे
एक ग्लास उकळलेल्या पाण्यात तुळशीची पाने घालून आटवून घ्या. पाण्याचा रंग बदलेपर्यंत, अपनी निम्मे होईपर्यंत पाणी आटवून घ्या.
पचन क्रिया सुधारते
तुळशीच्या पानांमध्ये पाचक घटक असल्यामुळे पचन क्रिया सुधारते. तुळशीच्या पाण्याच्या सेवनाने शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात. अपचन आणि तोंडाची चव गेल्यास पचन क्रिया सुधारते.
श्वसन रोगांपासून बचाव करते
तुळशीच्या पाण्याच्या सेवनाने श्वसन रोगांपासून बचाव होतो. श्वासाची दुर्गंधी कमी होते.
साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते
तुळशीचे पाणी चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे, ते चरबी आणि कार्बोहायड्रेट बर्न करण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखरेची नियंत्रणात ठेवते.
सूज कमी होण्यासाठी मदत होते
तुळशीच्या पाण्यामध्ये असणारे अँटीइन्फ्लेमेटरी गुण हे शरीरामध्ये आतून झालेली सूज कमी करायला मदत करतात.