सध्या गणरायाचं आगमन झालं आहे. त्यामुळे सगळीकडे भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच गणपतीच्या प्रसादासाठी अनेक ठिकाणी मोदक तयार केले जातात. शिवाय प्रसाद म्हणूनही मोदक दिले जातात. मोदक हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मोदक खाण्याचे अनेक फायदेही आहेत.
जाणून घेऊयात मोदक खाल्ल्याने शरीराला काय काय फायदे होतात
वजन कमी होते
ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्या लोकांनी मोदक जरूर खावेत. आवड म्हणून तर मोदक खावेच परंतु ज्या लोकांना वजन कमी करायचं असेल त्यांनी जरूर खावं. अनेक ठिकाणी मोदक साखर घालून तयार केले जातात. पण साखरेऐवजी गूळ घालून मोदक तयार करून खाल्ल्यास वजनही कमी करता येतं.
थायरॉईडची समस्या दूर होते
मोदक खाल्ल्याने थायरॉईडची समस्या दूर होते. मोदकात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल
मोदक खाल्ल्याने अजून एक फायदा होतो तो म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. त्यासाठी नारळासोबत मोदक खावीत. त्यामुळे साखरेची तृष्णा दूर होते. तसंच शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते.
त्वचेचे सौंदर्य वाढते
उकडीचे मोदक खाल्ल्याने त्वचा सुधारते. त्वचेला चमक येते. तसेच त्वचेचे सौंदर्य वाढते.
रक्तदाब सुधारतो
उकडीचे मोदक खाल्ल्याने रक्तदाब सुधारतो. शिवाय हाडे मजबूत होतात.