आयुष्मान योजनेच्या (Ayushman Scheme) नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यानुसार आता फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच मेंदू, प्रसूती आणि गर्भाशय शस्त्रक्रिया या आजारांवर उपचार केले जातील. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयुष्मान योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये मेंदू, प्रसूती आणि गर्भाशय शस्त्रक्रिया केली जात होती. मात्र आता यापुढे या तीन आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया फक्त सरकारी दवाखान्यांमध्येच केली जाणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये या आजारांवर उपचार उपलब्ध असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
2018 मध्ये, केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आयुष्मान योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सरकार गरजू लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देते.
आयुष्मान भारत योजना ही लोकांना मोफत उपचार देण्याची योजना आहे. केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर, सर्वात आधी आयुष्मान कार्ड बनतं आणि त्यानंतर त्याद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येतात. सरकार तुम्हाला दरवर्षी इतकं संरक्षण देतं आणि संपूर्ण खर्च उचलतं.