केसातील गुंता सोडल्याशिवाय तेल लाऊ नका. त्यामुळे केस कमजोर होऊन तुटतात.
तेलाने मसाज केल्यावर कंगव्याने केस विंचरू नका.
केवळ केसांच्या मुळांवरच तेल लावू नका, संपूर्ण केसालाही लावा.
तेल थोडं कोमट करून लावा. तेल अधिक प्रमाणात गरम करू नये.
प्रेशर देत मसाज करू नका. किंवा टाळूवर तेल लावताना रगडू नका.
तेल लावल्यावर टाइट वेणी घालू नका. केस ढिले बांधा.
केसांना दिवसभर तेल लावून ठेवू नका.
तेल लावलेले केस धुतल्यावर सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका.