चिकन
चिकन पुन्हा गरम करून केल्याने त्यातील प्रोटीनचं कम्पोझिशन पूर्णपणे बदलून जातं. त्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. गरम केलेलं चिकन पचण्यास देखील जड असते.

पालक
पालकांमध्ये असणारे नायट्रेट गरम केल्यानंतर हानिकारक घटकांत बदलतात.

अंडे
पुन्हा गरम केलेलं अंड खानाने आरोग्यास हानिकारक आहे. कारण पुन्हा गरम केल्यास, अंड्यातून टॉक्झिक रिलीज होतात आणि त्यामुळे अंडं पचण्यास त्रास होतो.

बटाटा
बटाटा जास्त वेळ ठेवल्यास आणि पुन्हा गरम करून खाल्ल्याने तुम्हाला पचनक्रियेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.

मशरूम
मशरूमची भाजी बनवल्यानंतर ती लगेचच खावी. दुसऱ्या दिवसासाठी ठेवू नये किंवा गरम करून खाऊ नये. मशरूमची भाजी पुन्हा गरम करता तेव्हा यातील प्रोटीन्स नष्ट होतात. तसेच त्यात विषारी पदार्थ तयार होतात.

बीट
बीट एकदा शिजवल्यानंतर पुन्हा गरम केल्याने त्यातील नायट्रेट संपून जातात.